पवित्र जननीआज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत व त्या वेगवेगळ्या अनुषंगाने कार्य करत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षनिक अशा विविध क्षेत्रात महिलांचे आघाडीचे स्थान दिसून येत आहे. तसेच यातूनच नवयुगातील तरुणीना उत्तम आदर्श असलेल्या आरोग्यविषयक काम करणाऱ्या महिला ही आहेत. कोणत्याही प्रसिद्धीसाठी व स्वार्थासाठी नसून, समाजासाठी झटत आहेत. अशा महिलांची माहिती आजच्या घडीला तरुणाई वर्गापर्यंत पोहचवने ही म्हत्वयाची बाब आहे.
याचमध्ल्या भारतीय महिला डॉक्टर. भक्ती यादव. यांचा जन्म 1926 साली उज्जैन येथे झाला. शिकण्याची आवड असल्यामुळे अनेक संकटाना सामोरे जाऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून एम बीबीएस करिता प्रवेश मिळवला, 1952 साली वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर डॉक्टर भक्ती ह्यांनी vatsalya नामक नर्सिंग होम, सुरु केले केवळ नवापूरते फी घेऊन उत्तम उपचार करणे ही डॉक्टर भक्ती यांची खासियत होती. अनेक गरजू व्यक्तीवर डॉक्टर भक्ती मोफत उपचार करीत त्यांची ही सेवा त्यांच्या मृत्यूपर्यंत अखंड सुरूच राहिली 2011साली भारत सरकारने पद्याश्री हा पुरस्कार देऊन भक्ती ह्यांच्या कार्याबद्दल गौरव केला. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांचे दुःखात आजाराने निधन झाले. अश्याच त्यांच्या कार्यातून डॉक्टर भक्ती ह्या महिलांसाठी उत्तम आदर्श मानल्या जातात.यातच एक नाव ते म्हणजे डॉक्टर रुख्मिणीबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. विवाह झाल्यानंतर ही पतीच्या घरी न राहून शिक्षणाची आवड जिद्द आणि मेहनत होती यामुळेच त्यांनी पूर्ण शिक्षण हे माहेरघरीच राहून केले ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना 1884 मध्ये दादाजीनी म्हणजेच पतीने वैवाहिक अधिकार काढून घेण्यासाठी कोर्टात दाखले दिले. पण मी वैवाहिक अधिकारांच पालन करणार नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते असा खंबीर विचार ठेऊन त्यांनी घटस्फोट घेतला.तसेच यां खटल्यातुन सुटका झाल्यानंतर रुख्मिणीबाईंनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आणि त्या डॉक्टर झाल्या वैद्यकीय क्षेत्रात 35 वर्ष योगदान दिल. याच काळात त्यांनी बालविवाहाच्या विरोधात चळवळ उभारली, सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकुण दिल वयाच्या 91 व्या वर्षी म्हणजेच 25 सप्टेंबर 1955 मध्ये त्यांचं निधन झाल. म्हणजेच एक विवाहित स्त्री समाजासाठी स्वतःचा संसाराचा विचार न करता निःस्वार्थ कार्य करू शकते याच उत्तम उदहारण म्हणून, रुख्मिणीबाई यांना ओळखलं जात. तरुणाईसाठीच नव्हे तर विवाहित महिलांसाठीही एक उत्तम आदर्श आहेत.जे जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील डॉक्टर राजश्री कटके ह्या प्राध्यापिका तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. आजच्या पिढीतील स्त्रियांच्या विविध आरोग्यविषयक माहिती दिली जाते.आज ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही स्त्रियांना अनेक शारीरिक समस्याना सामोरे जावे लागते. यातूनच महिलांना रोगराई विविध शारीरिक रोग, प्रेग्नेंसी मध्ये येणाऱ्या समस्या पिरियड मध्ये होणारे त्रास व यातूनच स्वतःची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास यातून udhbhvnare रोग हे स्त्रिच्या शरीराला हानिकारक असतात. यातूनच जगभरात स्त्रियांचा वाढलेला मृत्यूदर यातूनच ग्रामीण भागातील स्त्रियांना तसेच अशिक्षित महिलांना मुलींना आरोग्य विषयक समत्स्यa तोंड द्यावे लागते ..त्यांना आरोग्यविषयक कसलीच माहिती नसल्या मुळे या समस्या वारंवार उद्भवतात यावरच राजश्री कटके ह्या महिलांपर्यंत शैक्षणिक आरोग्यविषयक माहिती पोहचवन्याचे उत्तम कार्य गेल्या 15वर्षांपासून करीत आहेत वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल माध्यमातून तसेच यु ट्यूब चॅनेल द्वारे मुलाखती द्वारे हि माहिती महिलांपर्यंत पोहचते आहेत .यातूनच आजच्या पिढीला महिलांसाठी मदतीचा हातभार देऊन महिलांनी योग्य दिशा देण्याचे काम त्या करत आहेत । अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्या महिलांसाठी आरोग्यविषयक विविध कार्यक्रम राबवत आहे जेणेकरून त्यांचा महिलांशी थेट संबंध येऊन महिलांचे प्रश्न समस्या व त्यावर उपाययोजना शोधण्यास मदत होत आहे । अश्या उत्तम आदर्श असलेल्या राज्यश्री कटके महिलांसाठी आजही कार्यरत आहे । अशा जगभरातील महिला ज्या माहिलांसाठीच उत्तम आदर्श म्हनून खंबीर उभ्या आहेत हाच एका स्त्रीने दुसऱ्या स्त्री चा केलेला खरा सन्मान होय.
मनस्विनी साबळे..