प्रेम संबंध अन मृत्यू चा विलक्षण खेल असंधिमित्ता 2

चित्रपट पहिल्यांनंतर लक्षात आले कि, खरंच सुंदरतेला किती महत्व या समाजाने दिले आहे. ती सुंदर दिसते सडपातळ आहे तिचे केस तीच हसणं मनाला वेड लावून जात. खरंच हीच एवढीच सुंदरता असते का हो?

आजही स्त्री कडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नही ती अशीच दिसावी ती अशीच हसावि कारण ते लोकांना पटते.

आणि समाजाला तोंड देता देता ती थकते, तिची क्षमता ही संपते! आपण कसे दिसावे हे लोकांनीच ठरवले का? चित्रपटात सुरुवातीला जाड व शरीराने मोठी असलेली बाई दाखवण्यात आली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगून गेले कि तिला जगण्याची इचछा आहे, तिला परत प्रेम कराव वाटतं, तिला मलाही कोणी बघावं असं वाटतं, दरम्यान, तिच्या आयुष्यात एक पुरुष येतो आणि तो तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवतो. हो नाही करत ती तो प्रस्ताव मान्य करते. दरम्यान, या बाई ला दोन मुले असतात. तिच्या घरामधील एकंदरीत सगळंच “विक्की” म्हणजेच तिचा मित्र करीत असतो.

कुठेतरी तिलाही वाटतं कि माझंही ह्या जगात कुणीतरी आहे. ह्या च आशेवर ती जगात असते. पण ह्या चेहऱ्यामागे एक क्रूर व्यक्ती, एक गुनेगार लपलेला असतो, हे तिला कळत नसते.

शेवटी दोघेही पैसा कमवण्या साठी बऱ्याच गोष्टी करतात. देवीचे ढोंग घेणे, स्वतःसाठी वेगळं काहीतरी करणे, पण एके दिवशी दोघेही एका श्रीमंत असलेल्या घरात ओळख पटवायला जातात. विक्की म्हणजेच हा गुन्हेगार याच्या डोक्यात काही वेगळंच चालू असत.

दोघेही जातात, बोलतात. एका घरामध्ये दोन बायका असतात व तिथे सुंदर अशी बाई असते.तिला हा विक्की स्वतःकडे आकर्षित करतो आणि तिथेच राहतो.

जेव्हा ही ते बघते तेव्हा तिला जाणीव होते कि, हा खरंच एक खोटारडा माणूस आहे. तिचा पैसा लूटण्यासाठी तिघांचा ही खून ह्या ठिकाणी तो करतो. आणि ह्या घडलेल्या सगळ्या घटना ही बघत असते.

चौकशी होते. तो गुन्हेगार निघून जातो. आणि सगळं गुन्हा ही स्वतःवर घेते आणि फासावर चढते. ” खरंच समाजाला मी कंटाळले तो माझा होता आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याने जे सांगितले ते मी केले. त्याच्या प्रेमामुळे मी दुःखी विसरले, पण शेवटी तोच मला सोडून गेला. आत्ता विश्वास फक्त एकाच गोष्टीवर उरला आहे, तो म्हणजे मृत्यू! या जगात दुसरं काही सत्य असो वा नसो पण मृत्यू हे अंतिम सत्य आहे” असं म्हणत ती हसत हसत फासावर चढते आणि चित्रपट संपतो.

नकळत मनाला एक संदेश देऊन जाणारा हा चित्रपट.समाजपुढे एका स्त्रीला कशी वागणूक मिळते याचे एक मूर्तिमंत उदहारण hya चित्रपटतुन दिले आहे. आणि समाजाला त्या स्त्री कडून मिळालेला ha संदेश

मनस्विनी साबळे..

Leave a comment