ते दिवस 7

अग बस न किती नटणार पुरे aआई मला ओरडून म्हणाली अग हो ग काय ओरडतेस ग.. तुला माहितीय ना कॉलेज ला असच जावं लागत बाई कदाचित हे कुठेच लिहलेलं नाही कि कॉलेज ला मेकअप च करून याव पण उगीचच सांगायचं म्हणून सांगायचं तिला… पण उगीचच सांगायचं म्हणून सांगायचं तिला..

पण ती मला बोलली हो बाई आम्ही कॉलेज केलेच नाही जा जा बाई उशीर होईल तुला. मग मी माझी स्कुटी स्टार्ट करीत निघाले मस्त गॉगल लावून फुल जीन्स फॅशनेबल टॉप माझे हवेत केस उडवीत खरंय काय वेगळीच मजा म्हणावी ना ती मग त्यामध्ये न्यू ऍडमिशन न्यू फ्रेंड्स आणि एक कट्टा जिथे रंगलेल्या गप्पा ती कँटीन ची कचोरी आणि पानटपरीवरील चहा आन हे एवढंच..

मग शोधावा आपला क्लासरूम आणि तिथे एक असा बेंच कि जिथे बाईची नजर कमी पोहचेल हेच माझ्या मनात चाललेलं पण नवीन नवीन मुलं मुली आपल्या कोणी ओळखीचं नाही. उगीचच कोणाला हसलं तर त्यानी आपल्याला इग्नोर केल तर ही हास्यस्पद भीती मग चूप बसायचं आपल्या भाषेत सिन्सियर पण हल्ली किती दिवस मग नंतर एका नवीन मुलीने वर्गात प्रवेश केला.

ती साधीच दिसत होती अंगामध्ये नेसलेला पंजाबी ड्रेस आणि मान सरळ खाली अगदी घाबरलेली होती ती मग बाईने तिला नेमकेच माझ्या बाजूला बसवलं बाईचे तास सम्पल्यावर तिने नकळत माझ्याकडे पहिले मग ती हसली जणू तिला खूप खूप आनंद व्हावा. तिला मी बऱ्याच वेळ बोलें आणि तीही मला मनमोकळ बोली तीने मला नाव सांगितले कुसुम अगदी निरागस शांत प्रेमळ मग आम्ही दोघी नेहमीच सोबत राहायला लागलो आणि अशीच आमची मैत्री घट्ट रोवल्या गेली. 2 वर्षे पूर्ण झाली तीही पास झाली आणि मी ही आम्ही त्या दिवशी खूप आनंदात होतो हसत हसत कॅन्टीन ची कचोरी खात आणि पानटपरी ची चहा पीत मग आम्ही नोकरीं करण्याचं ठरवलं आम्हाला नोकरीही मिळाली पण वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकींपासून अगदी दूर ती आम्ही स्वीकारयला तयार नव्हतो पण दोघीचीयाही घरच्यांनी मोह घातल्यामुळे आम्हाला नको नको म्हणत नाईलाज शहर सोडून जावं लागलं मी मुंबई शहरात तर ती पुण्यामध्ये नोकरीं करत होती..मग दोघीनाही शहराची सवय झाल्यामुळे दुरावा निर्माण होत गेला प्रत्येकाच्या आयुष्यात बरीच लोक येऊन जातात परंतु काही लोक मनातच घर करून बसतात आणि आपल्याजवळ भरभराट अविस्मरणीय आठवणी देऊन जातात ज्यमध्ये आपण एकमेकांना न भेटताही ते आयुष सुखात जगत असतो अगदी न बोलताही…..

मनस्विनी साबळे

Leave a comment