भयं (भयं ) हा शब्द खरंतर माझ्या मनात एक घर करून बसला आहे. भयं हे प्रत्येकाच्या मनात असते पण प्रत्येक जण भितात का हो?
आज स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारला कि तुला भीती वाटते का? मनातून एकच उत्तर आले कि हो “मला भीती वाटते” पण कशाची? रात्री एकटं बाहेर निघण्याची रूमवर एकटं राहण्याची आणि कुठे दूरवर एकटा प्रवास करण्याची हो भिते मी कारण मला भीती वाटते.
कारण मी एक स्त्री आहे मी एक मुलगी आहे आणि मी बंधनात आहे, घरच्यांनी जरी माझ्यावर बंधने टाकली नसतील हे खरंय पण या जगाने नकळत बंधन टाकली आहेत कि तू हे नाही करायच स्ट्रिक्ट वॉर्निंग, बी अलर्ट, बी सेफ आणि एवढच नाही तर तुझ्या मनात एक भीती ठेव कारण तू सुरक्षित नाही…
एक हदरून टाकणारा प्रसंग अंगाला काटे येतील असं एक हत्याकांड जेव्हा वयाने 12 वर्षाची होते कळती झाले तेव्हा ऐकलेला घडलेला एक हत्याकांड (दिल्ली हत्याकांड) निर्भया प्रकरण…
2919 सात वर्ष उलटले तरीही गोष्ट घडलेली मनात घर करून बसली खरंच का? त्या निर्भया च्या आत्म्याला शांती मिळाली असेल.
दिल्लीमधील घटना 16 डिसेंबर 2012 चालत्या बसमध्ये तुमच्या आमच्या आईबहिणीसारख्या मुलीवर बलात्कार झाला. रात्रीच्या सुमारास एका निर्भया चा भयंभीत प्रकार घडला, यातून पुन्हा एकदा मुलीला तिची लायकी दाखवून देण्यात आली खरंच तू सुरक्षित नाही आणि स्वतंत्र नाही कायद्याने जरी तुला स्वातंत्र्य झाली असली पण समाजाच्या दृष्टिकोनातून तुला खरे स्वातंत्र्य नाही. मग पुन्हा आलाच कि हो सुरक्षिततेचा प्रश्न?
पुन्हा एकदा तीच आंदोलन तेच मोर्चे स्त्रियांनी सुरक्षित व्हावं म्हणून तोच समाज रस्त्यावर बेटी बचाओ, हेच नारे आजही होतात पण जेव्हा बलात्कार होतो तेव्हा हाच समाज शांततेत झोपलेला असतो. निर्भया वर भर रात्री चालत्या बसमध्ये बलात्कार झाला चार जनाणी मिळून वाहनचालकानेही बलात्कार केला. बलात्कार करून न थांबता ह्या नराधमानी तिच्या शरीरावरही हल्ले केले. व तिला आणि तिच्या मित्राला चालत्या बसममधून बाहेर फेकले.
आणि सात वर्ष तुरुंगात डांबल्या गेले पण शिक्षा अजूनही नाही का?
स्टेटमेंट आले कारणे समोर आली तरीही शिक्षा नाही का? या ठिकाणी कायद्याला चालूच दिल नाही आणि कुठेतरी सात वर्षानंतर फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्ट ठरवत. कुठेतरी उशिरा का होईना पण निर्भया ला न्याय मिळाला..
मनस्विनी साबळे..