मासिक पाळी 5

काय असते मासिक पाळी लहानपनापासूनच वाटायचं असते तरी काय? मग थोडी वयाने 11 वर्षाची झाले तेव्हा आईने सांगितलं अग मासिक पाळी म्हणजे प्रत्येक महिन्याला मुलीच्या गर्भाशयातून शरीराला नको असलेलं रक्त बाहेर पडण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया ती पाच ते सहा दिवस चालते जाऊदे तुला काय करायच तुझं आणखीन वय नाही अशा गोष्टी ऐकण्याचं..

खूप विचार केला? आणि प्रश्नही बरेच पडले शाळेमध्ये असताना पहिल्यांदाच सातवी कक्षेत असतांना माझ्याच वर्गमैत्रिणीला मासिक पाळी झाली माझ्या हिशोबाने पहिल्यांदाच झाली होती रक्ताचा भळाभळा स्त्राव बाहेर निघू लागला तीही रडू लागली mआणि हे सगळं बघून मीही घाबरले कळेनाच काय कराव ते शिक्षकांनी सांगावं पण त्यावेळी बाई नव्हत्या मग सरांना कस सांगावं हा विचार आमच्या मनात निर्माण झाला.

म्हणून तिला मागच्या बाजूला स्वेटर बांधून मी तिच्या घरी तिला घेऊन गेले व सगळी घडलेला प्रकार सांगितला. पण आजही मनात एक प्रश्न मात्र घर करून बसला कि आम्ही ह्या विषयी सरांना का बोललो नाही का? आमच्या डोक्यमध्ये असा विचार का आला कि ही गोष्ट फक्त बाईलाच सांगू शकतो गुरुजींना नाही.तेव्हापासून नकळत त्याच वयात हा पगडा घट्ट रोवल्या गेला कि मला हे सांगल्या लाज वाटते.

मंदिरात जायचं नाही घरातल्या खाण्यापिण्याच्या वस्तुंना शिवायचं नाही ह्या गोष्टी लहानपनापासूनच घरातूनच संस्कारात घट्ट लादल्या गेल्या असच म्हणायला हवं. आणि ह्याच गोष्टीमुळे पुरुषांना स्त्रीपेक्षा वेगळे स्वतंत्र स्थान दिल्या गेले मग आल्याचं कि धर्माच्या नावाखाली देवदासी बुवा, महाराज मुरली ह्या सगळ्या गोष्टी चालवण्यात आल्या मग एक पद्धतशीरपणे धर्माचा राजकारण.

मग एक चिंगारी ने हजारो ने आग लागली कि स्त्री ही त्या चार दिवसात अपवित्र झाली..

का ती बनवण्यात आली मग ह्या प्रश्नाचे उत्तर ही तिला उंच मानाने आणि एकदा डोळ्यात डोळे घालून द्या..ती अपवित्र आहे पण तिच्यापासून ह्या जगाची निर्मिती झाली मुलं हवं आहे पण तिच्यापासून ह्या जगाची निर्मिती झाली मुलं हवं आहे पत्नी ही पाहिजे शारीरिक भूक जर भागत नसेल तर अर्धंगिनी ही पाहिजे पण तरी ती आम्हाला त्या चार दिवसात अपवित्रच पाहिजे.पण आम्हाला स्त्री पाहिजे

शेतीची उत्पत्ती एका स्त्रीने केली तिने बीज रोवले तर शेती बहरली फुलली आणि त्याच्यावर तुम्ही व्यवसाय सुरु केला. ती गव्हपासून भाकरी बनून तुम्ही खाल्ली भूक भागवली मग ते अन्न तुम्हाला अपवित्र नाही का जेव्हा मासिक पाळीमुळेच स्त्री एका नव जीवाला जन्म देते तेव्हा ते मुलं अपवित्र नाही का? हे स्वतःच्या मनालाच विचारा…

जाच सहन करण्याची एकमेव ताकद ही निसर्गाने स्त्रीलाच दिली आहे

हा विषय बाजूला ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता ह्या सगळ्या गोष्टी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

मनस्विनी साबळे..

Leave a comment