जीवनात बऱ्याच गोष्टी घडल्या कळतं न कळतं त्याचा अनुभव ही आला. आता नवीन वर्षाची सुरुवात होणार प्रत्येक ठिकाणी जल्लोषाचे वातावरण असणार कारण आता 2019 हे वर्ष संपून 2020 या नव वर्षाची सुरुवात होणार पण प्रत्येक वर्षी नवीन घडणार हे नक्कीच माझ्या आयुष्यात जीवनाला कलाटणी देणारा क्षण मी अनुभवला. अर्थातच या गोष्टीबद्दल ऐकले होते आणि जेव्हापासून मी वयाने वाढत गेले. तसतसे मला या गोष्टीचे ज्ञान येत गेले.
पण मी जसे आईबाबाकडे हट्ट केले मला जी गोष्ट आवडली तीच केली मला जे पाहिजे ते मला मिळाले आईचे प्रेम, माया बाबांनी माझे लाड पुरविले जेमतेम जेवढं माझ्या आईबाबांना श्यक्य होईल तेवढं मला त्यानी दिल. आणि आजही देतच आहेत. जेव्हा मी माझ्या महाविद्यलयाकडून मिळालेला उपक्रम राबवीला अर्थातच तो माझा अभ्य्साचा भाग होता. तशी मनातून करण्याची इच्छा नव्हती कारण विषयच मला मिळत नव्हता.
जेमतेम नको नको म्हणत खूप फिरल्यानंतर मी एका Hiv बालगृहाला भेट दिली सरांशी बोलण झालं आणि माहिती काढली जेव्हा Hiv झालेल्या मुलांशी संवाद साधला तेव्हा लक्षात आलं कि आपण योग्य विषयाची निवड केली आहे खरंतर सांगायचं म्हंटल तर वयाची 5 ते 18 वर्षापर्यंतची मुले मी बालगृहामध्ये पहिले. ज्या मुलांना अनाथ म्हणून सोडलेली व त्यांचं सगळं शिक्षण खरंच राहण्याची सोय खाण्यापिण्याची सोय हे बालगृह करीत होते.
ही बाबसाई एड्सग्रत मुलामुलींचे बालगृह गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहे. ह्या मुलामुलींना शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक आणखीन बऱ्याच सोयीसुविधा पुरवल्या जातात. तसेच ह्या मुलामुलींमधील गुणकौशल्य पाहून मलाही नवलच वाटले खरंच बिना आईवडील असलेली मुलं हे खरंच जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये आनंद शोधत असत. ह्या मुलांमधील सामर्थ्य आत्मविश्वास आशा आणि कौशल्य पाहून मी विचारात पडले. खरंच किती प्रेमळ आणि मेहनती मुलं होती ती, त्यांच्या डोळ्यातील हावभाव व त्यांचे बोलणे एकूण मी भारावून गेले खरंच ही मुलं देशाचं पुढील भविष्य होती हे मला त्यांच्या कौशल्यातून दिसून आले. मी त्यांना बऱ्याच विषयवार प्रश्न विचारले व व प्रश्नांची उत्तरही त्यानी कौशल्य पूर्ण दिली अशा मुलांना आपल्या मदतीची अत्यंत गरज आहे. यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा जेणेकरून यांच्या यशामध्ये आपलंही योगदान लाभेल. जिथे गरज असते तिथे मदत हवी जिथे कौशल्य असते तिथे यश ही नक्कीच असते. ज्यांना जगण्या मारण्याची आशा आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण ते आशेवर जगत आहेत.
विश्वासाने संकटाला सामोरे जात आहेत मग यांच्यापेक्षा आपण कितपत सुखी आहोत हा विचार करावा आणि जीवनाचा प्रत्येक क्षण हा आनंदात जगा वा अगदी निष्पाप वृत्ती ठेऊन स्वार्थी न बनता समजदार बना कोणतीही गोष्ट ही खोलवर गेल्यावरच कळते असं नाही पण तुम्ही त्या गोष्टीची सुरुवात करा त्यातलं ज्ञान आणि jagmyachi कला आत्मसात करा.
मनस्विनी साबळे..