कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रथम: स्वतःमध्ये इच्छा व विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर विश्वास आणि इच्छा पासूनच नाही तर ती करण्याची तयारी ही असली पाहिजे तरच ते कार्य पूर्ण होऊ शकते.
एक वेळ अशीही येते कि ज्यमध्ये आपण इच्छा आत्मविश्वास गमावून बसतो. पण त्यावेळी आशेचा किरण आपल्या डोळ्यासमोर स्थिर आणि तटस्थ उभा असतो. कि तू फक्त आशा आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेव तू हे कम नक्कीच पूर्ण करशील थोडा वेळ लागेल पण तू सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करशील ही एक आशा मनात दडलेली असते. जेव्हा वेळ साथ सोडते तेव्हा क्षणाक्षणाला आशा आणि विश्वास आपल्यामध्ये असतो फक्त तो उमलाला पाहीजे. जोपर्यंत तुमच्यामध्ये आशा विश्वास आहे. तोपर्यंत तुम्ही हरलेले नाही म्हणून, समजा वेळ लागेल पण यश नक्की मिळेल त्यामुळे आशा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे.
मोठमोठ्या विद्वानानी सुद्धा स्वतः कष्ट घेऊन समाजासाठी जीवन उदार केले आणि आज आपली छाप समाजावर पाडून गेले. त्यासाठी लागणारी जिद्द चिकाटी ही होतीच पण त्याचबरोबर आत्मविश्वास व आशाही होती म्हणूच त्यानी आज जगाच्या कानाकोपऱ्यात आपले विचार पसरवले स्वविश्वास जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत प्रगती होणे अश्यकच आहे. उत्तम व सुखरूप जीवनासाठी उत्तम प्रयत्नही करावे लागतात. एखाद्या मनुष्यवर इतरांच्या विचारांचा परिणाम तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तो स्वतः होऊ देत नाही.
मनुष्याने समस्यांना तोंड देताना आशेची कस कधीच सोडता कामा नये कारण एखाद्या छोट्याश्या आशेनेही समस्यांचं ओझं हलक होऊ शकते. आशेचा एक छोटासा किरणही मनुष्याला चक्रीवादळातही टिकून ठेवण्याची हिम्मत देऊ शकतो. आशा ही मनुष्याला नवीन जीवन जगण्याची प्रेरणा देते…
मनस्विनी साबळे
Bamcj second yr