दारिद्रय 8

कोरोना सारख्या महामारी मुळे आज पूर्ण देश चिंतेत पडलेला आहे.
पण यांच काय यांची जबादारी कोण घेणार हो? यांची काळजी तर जन्मदात्या आईवडिलांना ही नही का?
अर्थातच ह्या चिमुकल्या निव्वळ 10 वर्षाचा मुलगा न अंगावर नीट कपडे ना पायात चप्पल मी घराच्या दारात बसलेली असताना त्याला अंगावर प्लास्टिक चे पोत लटकलेले इवल्याश्या खांद्यावर एवढा बोज…
मी स्तब्ध झाले मुलाला जेव्हा विचारले तेव्हा त्याने सांगितले मी हे काम गेल्या दोन वर्षापासून करतो आणि माझे आईवडील मला हे काम करायला लावतात, तरच मला घरी दोन वेळची भाकर मिळते
आणि हे प्लास्टिक विकून आलेल्या पैशाचा हिशोब मला घरी द्यावा लागतो ज्या मुलाच्या पायात चप्पलही नही आज आज भर उन्हात 2:30 वाजता त्याची भेट झाली आणि तो उपाशीच होता.
नतंर कळले कि त्याला शिक्षणाची ही आवड आहे.
तेव्हा त्याला शिकायच आहे हे त्याने सांगितले पण माझ्या घरचे आई वडील मला शिकू देत नही हे त्यानी मला सांगितले
पण खरंच माझ्याकडून जे शक्य झाले ते मी केल मी त्याच्यासाठी करू शकेल पण पुढे काय त्याची जबाबदारी त्याचे स्वतःचे आईवडील घेऊ शकत नही
काय म्हणावं ह्या जन्मदात्यांना
आणि नवल असं मी त्याला कोरोना ह्या रोगाबद्दल विचारलं कि तुला भीती वाटत नही का तेव्हा त्याने एकच उत्तर हसत हसत मला दिले
नाही मी कशालाच भीत नाही
मला सवय आहे अशा रोगांची
काय म्हणावं काय कराव मी निशब्द झाले आज

मनस्वीनी साबळे

Leave a comment