काही तरी लिहावं म्हणून पेन हातात घेतला पण लिहावं काय? हा विचार मनात येत होता. बऱ्याच वेळ अनेक लेखकांची पुस्तके कवीची कविता कथासंघ्रह वाचून मला कि मी ही काही तरी लिहावं. अर्थात ते लिहीन माझ्यापुरतं आणि माझ्या वहीपूर्त मर्यादित नसावं ते ही कोणीतरी वाचावं बघावं आणि समजून घ्यावं..
एक कथा आणि कविता माझ्या मनात नकळत घर करून जाते. माझ्या बालपणी मला अत्यंत मराठी विषयाची आवड. माझे शिक्षण मराठी शाळेत झाले असल्यामुळे मराठी माझ्या हृदयात वसली आहे आणि मी तिला दूरही करू शकते नाही कदाचित दोघींचा संबंध न तुटण्यासारखा आहे.
मराठी भाषेंवर माझ्या अपार आणि निःस्वार्थ प्रेम आहे. मी सहा विषयाची पुस्तके आणि ह्या सहा विषयातून माझ्या आवडत पुस्तक मराठी मराठी विषयात बालपणी सगळं जग निसर्ग आणि माझ बालपण मला दिसत. त्यातील गोष्टी कविता प्रत्यक्षात अवघ चित्र डोळ्यसमोर उभ करतात.
का असं? असावं पण कदाचित सगळ्यांना माझ्यासारखं वाटतं नसेल. पण नक्कीच लेखकांना हे वाटतच असेल जे मला वाटतं.
ज्या पुस्तकात मराठी विषयात मी माझ्या जग शोधत असते बालपण शोधत असते.
बालपणापासून आता ते वयाच्या 18 वर्षयपर्यंत मराठी विषय हा माझा आवडता विषय आहे.
त्यामधील अभिरुची आत्मीयता खरंच किती नितळ आणि खरीखुरी मला वाटते एकदा शाळेत असताना इयत्ता चौथीत मला वासरू ही कविता फार आवडायची विशेष म्हणजे, मी ही कविता शंभर वेळेस आत्तापर्यंत गायली. व वाचली असावी. माझ हे कवितेवर नितांत प्रेम काही गोष्टी काही काही माणसं काही घटना जीवनात आपल्याला कळतं नकळत आंनद दुःख, प्रेम, आठवणी देऊन जातात.
खरंच ते बालपण त्या त्या घटना आठवणी पुरत्याच मर्यादित का राहतात आणि एक आठवण म्हणून आपल्याला दिसतात.
मनस्विनी साबळे…